आता NCB चे हे अधिकारी करणार आर्यन खान केसचा तपास; एजेंसीने बनवली विशेष रणनीती
मुंबई ड्रग्ज केसमध्ये दररोज नवीन ट्विस्ट समोर येत आहे. दिल्ली सह इतर राज्यातील NCB युनिटमधून अधिकाऱ्यांना मुंबई बोलवण्यात येत आहे. ते सर्व 6 प्रकरणांचा तपास करतील.
नवी दिल्ली : मुंबई ड्रग्ज केसमध्ये दररोज नवीन बाबी समोर येत आहेत. NCB चे क्षेत्रिय डायरेक्टर समीर वानखेडे यांना आर्यन खान सह इतर 6 प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आले आहे. आता एनसीबीची एसआयटी या प्रकरणांचा तपास करणार असून याकरीता एसआयटीची टीम मुंबईत पोहचणार आहे.
एनसीबीची एसआयटी आज सकाळी 9.30 ला एअर इंडियाच्या प्लाइटने मुंबई पोहचली आहे. या एसआयटीचे हेड आणि DDG ऑपरेशन संजय सिंह हअसतील ते आपल्या टीमसह मुंबईत पोहचले आहेत.
दिल्लीत काय हालचाली?
या प्रकरणी मुंबईत दररोज घडामोडी सुरू आहेत. परंतु राजधानी दिल्लीत देखील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आर्यन खान प्रकरणातील एक तपास अधिकारी आशीष रंजन प्रसाद यांची एनसीबीच्या विजिलेंस टीमने चौकश केली. आशीष रंजन यांची चौकशी करण्याची ही दुसरी वेळ आहे.