मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) बॉलिवूड निर्माते इम्तियाज खत्री (Imtiaz Khatri) यांना पुन्हा समन्स बजावलं आहे. एनसीबीने इम्तियाज खत्री यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे. एनसीबीने खत्री यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. यानंतर सोमवारी एनसीबी पुन्हा खत्री यांची चौकशी करणार आहे. याआधी शनिवारी NCB ने तब्बल आठ तास इम्तियाज खत्री यांची चौकशी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातही (Sushant Singh Rajput) इम्तियाज खत्री यांचं नाव समोर आलं होतं. पण त्यावेळी इम्तियाज खत्री यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता मुंबईत ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अचित कुमार (Achit Kumar) याच्या चौकशीत इम्तियाज खत्री यांचं नाव समोर आलं. त्यानंतर एनसीबीने खत्री यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकत समन्स बजावलं.


आर्यन खान न्यायालयीन कोठडीत


NDPS न्यायालयाने ड्रग्स प्रकरणात अटक केलेल्या बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा ( Shah Rukh Kahn) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यासह 8 आरोपींची जामीन याचिका फेटाळली होती. त्यामुळे आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. यावर आता सोमवारी सुनावणी होऊ शकते.


प्रकरण नेमकं काय 


2 ऑक्टोबरला एनसीबीला एका पार्टीत काही लोकांकडून ड्रग्स पुरवठा आणि सेवन होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एनसीबीच्या जवळपास 22 अधिकाऱ्यांनी पार्टीत धाड टाकत 8 जणांना संशयावरुन ताब्यात घेतलं. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे.