Sharad Pawar Health : शरद पवार रुग्णालयात दाखल; पत्रकातून समोर आली आरोग्यासंदर्भातील माहिती
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर, रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय .
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांवा प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालात ते पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. 2 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळेल. ज्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबरला ते शिर्डीला जाणार आहेत. 4 आणि 5 तारखेला होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनातही त्यांची उपस्थिती पाहता येणार आहे.
पवारांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असणारं चिंतेचं वातावरण पाहता पक्षाच्या वतीनं एक पत्रक जारी करण्यात आलं. ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्याचं कारण आणि त्यापुढे त्यांच्या कार्यक्रमांची रुपरेषा कशी असेल, याबाबतची स्पष्ट माहिती देण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच पवारांनी कुटुंबीयांसमवेत दिवाळी (Diwali 2022) साजरा केली. सालाबादप्रमाणे याहीवर्षी बारामतीतील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. आपल्या नेत्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवण्यासाठी म्हणून यावेळी उत्साहानं अनेकांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : Diwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video
शरद पवार यांच्यासह त्यावेळी व्यासपीठावर (Rohit Pawar) रोहित पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule), अजित पवार (Ajit Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawra) यांनीही उपस्थित राहत समर्थकांच्या प्रेमाचा आणि शुभेच्छांचा स्वीकार केला होता.