मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करून पवार यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असून, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.


गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.