मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गंगाखेडचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे आज पाहायला मिळालेत. पराभवाच्या मुद्यावरून वादावादी झाली. दरम्यान, मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद उफाळून येताना दिसून येत आहे. त्याआधी नीरा पाण्यावरुन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात जाहीर वाद झाला. हा वाद मिटविण्याच्यावेळी शरद पवार यांच्या उपस्थित उदयनराजे बैठकीतून बाहेर पडलेत. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वाद उफाळताना दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करीत असताना बाहेर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक राजकारणाच्या वादातून गोंधळ घालण्यास सुरवात केली होती. या दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसात शिव्याची देवाण घेवाण होत होत होती.


हे प्रकरण हातघाईवर आले. वादावादीचे प्रकरण अधिकच पुढे जात हे कार्यकर्ते एकमेकांना धक्का बुक्की करू लागले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याना जागेवरुन हटवून प्रकरण शांत केले.