मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळांना देशभरात कुठेही जाण्यास परवानगी दिली असून मुंबईबाहेर जाताना पूर्वपरवानगीची गरज नसल्याच न्यायालयाने म्हटले आहे. मात्र महाराष्ट्राबाहेर जाताना तपास अधिकाऱ्यांना माहिती देणे भुजभळांना बंधनकारक आहे. कुठे चाललो आहोत याची सर्व माहिती मात्र भुजबळांना तपास अधिकाऱ्याला द्यावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, छगन भुजबळ यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा केला. यात नागपूर, नाशिक, पुणे, येवला येथे भेटी दिल्यात. येवला-लासलगाव मतदार संघात छगन भुजबळ दाखल होतात कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत केले जंगी स्वागत केले. यावेळी भुजबळांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत होती.


तर छगन भुजबळ यांना अडीच वर्षानंतर जामीन मिळाल्याने विधानभवनात अधिवेशनाला उपस्थिती लावली. यापूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी न्यायालयाच्या परवानगीने भुजबळ मुंबईच्या विधानभवनात आले होते. भुजबळ यांनी अधिवेशनात जोरदार बॅटिंग करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले. तसेच त्यांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 


 राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नागपुरात आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी व समता परिषदच्या कार्यकर्त्यांनी केले भुजबळ यांचं विमानतळावर स्वागत केले. तर खुल्या जिप्सीतून भुजबळ यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. सिडको प्रकरणात मुख्यमंत्री बहुरंगी भूमिका निभावत आहेत, मंत्र्यांची वकिली करीत आहेत मुख्यमंत्री, असा हल्लाबोल चढवला होता. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या शेतकरी, सामान्य लोक, आदिवासी, व्यापारी सर्वच अडचणीत आहेत, अशी टीका भुजबळ यांनी केली होती.