मुंबई : आज सकाळी ८ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. परंतु या चर्चेमध्ये काय झालं हे मात्र समोर आलेलं नाही. या नेत्यामध्ये सुमारे १ तास चर्चा चालली. परंतु श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या नेत्यांनी माध्यमांना यासंबंधतीत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे फार जवळचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. 


परंतु, या चर्चेत नक्की काय झाले कळाले नाही. अजित पवारांनी भाजप पक्षाची साथ सोडावी या उद्देशाने सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.   


दरम्यान, अजित पवारांच्या पाठिंब्यानं मजबूत महाराष्ट्र घडवणार, राज्याला स्थिर सरकार देणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी चार वाजता भाजपाच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला.