सागर कुलकर्णी, मुंबई : मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीची सत्तादेखील संपुष्टात आली आहे. आता नवीन सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांना विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांचे कुंटुंब चौकशीच्या घेऱ्यात आहे. त्यामुळे ते विरोधी पक्ष नेते पद घेण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा विरोधी पक्षनेतेपद दिले जाते की नाही. याबाबत शंका आहे. परंतू प्रदेशाध्यक्षपद इतर कोणाकडे दिल्यास त्यांच्याकडे विरोधीपक्षनेते पद येऊ शकते.


तुर्तास धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते पदावर जबाबदारी द्यावी. कारण मुंडे यांचे भाजपातील नेत्यांशी संबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांच्यातील समन्वय चांगले राहील. असा विचार पक्षात सुरू आहे. या आधी धनंजय मुंडे यांना दिलेली विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी चांगली पार पाडली आहे. 


विधान परिषदेत शशिकांत शिंदे यांना विरोधी पक्ष नेते पद करण्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे सर्वात वरिष्ठ अनुभवी सदस्य आहे. पण पक्षात नुकताच प्रवेश, वयाची मर्यादा यामुळे खडसे यांची संधी हुकू शकते. त्यातच खडसे यांची भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा चौकशी ईडी नोटीस यामुळ ही खडसे यांच्या नावाला एनसीपी पक्षातील काही लोकांचा विरोध होऊ शकतो.