रोहित पवारांची तुफान बॅटिंग!
राजकीय नाही तर खेळाच्या मैदानावर दिसले रोहित पवार
मुंबई : आमदार रोहित पवार हे तरूणांच्या मनात वेगळं घर करून आहेत. रोहित पवारांच्या प्रत्येक गोष्टी तरूणाईत चर्चेत असतात. आता रोहित पवारांची फटकेबाजी (Rohit Pawar playing Cricket) चर्चेत आहे. महत्वाचं म्हणजे ही फटकेबाजी राजकीय मैदानावर नाही तर खेळाच्या मैदानावर पहायला मिळत आहे. रोहित पवार बॅट हातात घेऊन तुफान बॅटिंग करताना दिसत आहे.
विक्रोळी पार्कसाईट येथे 'महाविकास आघाडी चषक' या नावाने भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा देखील उपस्थिती होत्या.या वेळी रोहित पवार यांनी मैदानात उतरून फटकेबाजी देखील केली.
या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी क्रिकेट सोबत २६ जानेवारी येथील शेतकरी आंदोलन , भाजपचे आरोप आणि लोकल सेवा सुरू करण्याबाबत च्या प्रश्नांवर देखील उत्तरे दिली. माननीय सर्व अंदाज घेण्यासाठी महा विकास आघाडीचे सर्वत्र साहेब. कोरोनाचे रेट आता येत्या काळात कमी झालेला आहे. लस देखील आलेली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर लोकल सुरू करावी कारण नागरिकांचा मानसिक ताण देखील वाढतो आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये समन्वय योग्य असेल तर लोकल सुरु होईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.