मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची आपल्या आमदारांसोबत बैठक सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हाँटेल ललितमध्ये संजय बनसोडे यांना आणून भाजपच्या संपर्काबाबत विचारपूस केली. दरम्यान, निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही आपण राष्ट्रवादीसोबत आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. पक्षाला सर्वाधिकार आहेत. त्यामुळे पक्षाने काय निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनी घ्यावा. मी काय सांगणार, असे बनकर म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार संजय बनसोड यांची माहीती मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. त्यानंतर पवारांच्या सूचनेनुसार माजी आमदार शशिकांच शिंदे हाँटेल ललितमध्ये आले आणि आमदार संजय बनसोड यांना सोबत घेऊन जाण्यास निघाले. मात्र आमदारांच्या सुरक्षेसाठी स्वत: शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय बनसोड यांनी कारमध्ये बसवून शरद पवार यांच्या ताब्यात देण्यासाठी हाँटेल ललितमधून निघाले आहेत.


राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपने आज अचानक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपच्या या राजकारणामुळं धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्याच वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बुलडाण्याचे आमदार राजेंद्र शिंगणे, सुनील शेळके यांनी आपण पक्षासोबत असल्याचे सांगितले. आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. बैठक असल्याचे सांगितले. आम्ही तेथे, असे त्यांनी सांगितले.