मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी राजकीय उलथापालथ (Maharashtra Political Crisis) झाली. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे महाविकास आघाडी सरका (Mahavikas Aghadi) कोसळलं. शिंदेंच्या या बंडामुळे शिवसेनेला (Shiv sena) उतरती कळा लागली. एकाचवेळी 40 आमदार आणि त्यानंतर खासदारांनी साथ सोडल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यानंतर उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हंही गमवावं लागलं. दरम्यान यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (Ncp) अशीच फूट पडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याचं कारण आहे शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी केलेलं वक्तव्य. (ncp party many leaders are in contact with eknath shinde group says vijay shivtare)


शिवतारे काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात बारामती मतदारसंघात हादरा येणार असल्याचं शिवतारे यांनी दावा केला. तसेच राष्ट्रवादीतील चांगल्या विचारांची लोकं शिंदे गटात येतील, असंही शिवतारे यांनी नमूद केलं. त्यामुळे आता शिवतारे यांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिय येते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. 


अमोल कोल्हे नाराज?


दरम्यान दुसऱ्या बाजूला पक्षाचे फायर ब्रँड नेते खासदार अमोल कोल्हे यांनी मंथन शिबीराकडे पाठ फिरवली. खासदार कोल्हे हे पक्षाच्या कामाच्या पद्धतीवर नाराड आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे कोल्हे राष्ट्रवादी सोडणार का इथपर्यंत चर्चा रंगली आहे.