मुंबई : काँग्रेस कार्य़कारिणीची दिल्लीत बैठक झाली, यानंतर आणखी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांशी दुपारी 4 वाजता दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपला निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीची मुंबईतील बैठक संपल्यानंतर सांगितलं आहे. पण पर्यायी सरकारची स्थापना झाली पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक म्हणाले, शरद पवारांनी या आधीही सांगितलं आहे, आम्ही विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत लढवली, जोपर्यंत काँग्रेसचा शिवसेनेला पर्यायी सरकारसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपल्या निर्णयाची घोषणा करणार नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय काँग्रेसचा निर्णय झाल्यानंतर जाहीर होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय एक असावा, अशी भूमिका राष्ट्रवादीची असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं पत्र देण्यासाठीस संध्याकाळी साडेसातपर्यंतच वेळ दिला आहे.