Maharashtra Politics : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जादूटोणा करुन जाळ्यात ओढल्याची घणाघाती टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.  एकदा कुणी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ताब्यात आलं की सुटत नाही,  उद्धव ठाकरेंनी केवळ काँग्रेसचं (Congress) संविधान स्वीकारायचं राहिलंय अशी बोचरी टीकाही बावनकुळे यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रशेखर बावनकुळे हे आज सातारा दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बेईमानी करुन सत्ता स्थापन केली, पण आता राष्ट्रवादीने सत्तेची स्वप्न पाहणं सोडावं असाही टोला बावनकुळे यांनी लगावला. आता आम्ही सतर्क असून पुन्हा सरकार निवडून येईल तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 200 हून अधिक आमदार निवडून आणणार असल्याचा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.


राष्ट्रवादी काँग्रेसचं उत्तर
बानवकुळे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळेच थाळ्या वाजवणाऱ्या भोंदू बाबाच्या संपर्कात असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. बावनकुळेंचं विधान म्हणजे अंधश्रद्धेला (Superstition) खतपाणी घालणारं असल्याचीही टीका केली. महाराष्ट्रच्या जनतेला माहित आहे की भोंदू बाबा दाढी वाढवत असतात, टाळ्या,थाळ्या वाजवायला सांगतात. अंधश्रधेला ते खतपाणी घालत आहेत, बावनकुळेची ती पात्रता नाही असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. 


चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचं त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, भाजपला विषारी वातावरण निर्माण करायचं आहे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार जे बोलतात त्यांना सत्तेची मस्ती अल्याची टीकाही मिटकरी यांनी केली आहे.