मुंबई : जेजे हॉस्पीटलजवळील नंदविलास सोसायटीच्या छताचा काही भाग कोसळला आहे. सकाळी 4 वाजता ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्यांना जेजे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत काल आणि परवा प्रचंड पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम जुन्या बांधकामांवरही झाला. सलग झालेल्या पावसामुळे नंदविलास सोसायटीच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना पहाटे समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नंदविलास इमारतीच्या शेजारचा परिसर वर्दळीचा आहे. घटना घडली तेव्हा फार गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. तसेच नंदविलास सोसायटीतील नागरिकही तात्काळ मदतीसाठी धावून आले. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.