मुंबई : धाराशिवमधील (Dharashiv) लेडी कंडक्टर मंगल गिरी (Mangal Giri)यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने नेटकरी आक्रमक झाले आहेत. मंगल गिरी यांनी केलेल्या रिल व्हीडिओमुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याने निलंबनात्मक कारवाई केली, असं एसटी प्रशासनाने सांगितलं. या मुद्द्यावरुन नेटकऱ्यांनी एसटी प्रशासनाला खडेबोल सुनावत आत्ताच कशी महामंडळाची प्रतिमा मलिन होतेय, असा सवाल विचारला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय. तसेच राजकारणीही या लेडी कंडक्टरच्या मागे उभे राहिले आहेत. त्यांनी ही कारवाई मागे घेण्याची मागणी केलीय. (netizens angry after maharashtra st coroporation suspended to dharashiv conducter mangal giri)


व्हायरल पोस्टमधून एसटी प्रशासनाला प्रश्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी ची प्रतिमा आताच का मलिन झाली???
धाराशिवच्या एका लेडी कंडकटरने ड्युटीवर असताना उनिफॉर्मवर Reels बनवले म्हणून एसटी ची प्रतिमा मलिन झाली. यामुळे तिचे आणि सहकारी कर्मचाऱ्याचे निलंबन झाले!!
एसटी ची प्रतिमा आताच मलिन झाली का??
कारण या आधी जेव्हा खुद्द एसटी च्या कर्मचाऱ्यांचे विलनिकरणसाठी जीव गेले  तेव्हा प्रतिमा मलिन नाही झाली???
रोज आख्या महाराष्ट्र सुटणाऱ्या एसटी बस खीळ-खिळ्या अवस्थेत फिरते, ना केव्हा धुतली जाते ना केव्हा साफ केली जाते तेव्हा तिची प्रतिमा मलिन होत नाही?
जेव्हा एसटी बस प्रवासाला निघते आणि तिचा पत्रा तुटतो आणि अपघात होऊन दोन युवकांना कायमचे हात गमवावे लागतात तेव्हा प्रतिमा मलिन नाही होत???
जेव्हा एसटी अर्ध्या रस्त्यात बंद पडते तेव्हा तिची प्रतिमा मलिन नाही का होत..??
मान्य आहे तिने ड्युटी वर असतात व्हिडिओ काढला ते चुकीचे आहे पण एकदम तिला निलंबीत करण्या ऐवजी समज दिली असती तर बरं झालं असतं. 
तिने एसटी ची प्रतिमा उनिफॉर्मवर Reels बनवून मलिन केली म्हजून तिला निलंबीत केले मग त्या अधिकारी लोकांना पण निलंबीत करा ज्यांच्या मुळे वरील कारणामुळे एसटी रोज मलिन होते!!!!


अजित पवारांचा अधिकाऱ्यांना फोन 


विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगल पुरी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरुन आक्रमक झालेत. ही कारवाई मागे घेण्यासाठी पवारांनी एसटी अधिकाऱ्यांना फोन केला. तर आमदार रोहित पवार यांनीही ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता एसटी महामंडळ नेटकऱ्यांच्या रोषानंतर ही निलंबनात्मक कारवाई मागे घेणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.