दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर नवे आरोप झाले आहेत. विखे पाटलांनी मेहतांच्या चिरंजीवाच्या चाळीतील खोलीचा उल्लेख करून आरोपांची मालिका आणखी पुढे नेली. गृहनिर्माणमंत्र्यांनी चाळीमध्ये भाड्यानं खोली घेतल्याची माहिती आमच्याकडे असल्याचं विखे पाटील म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाळीचा पूनर्विकास होणार आहे, त्याच चाळीत मंत्री, मुलगा आणि इतर नातेवाईकांनी खोल्या घेतलेल्या असतात. बोगस भाडेकरू दाखवून सदनिका लाटण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. गृहनिर्माणमंत्री त्यांचा मुलगा अधिकृत भाडेकरू असल्याचं सांगतात, पण तसा कोणताही पुरावा नसल्याचं विखे पाटील म्हणाले.


किशोर मेहता नावाचा भाडेकरूच नाही. किशोरी मेहता नावाच्या भाडेकरू आहेत. रेकॉर्डमध्ये स्पष्टपणे खाडाखोड केल्याचा आरोप विखे पाटील यांनी विधानसभेत केला. तसंच प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत.