मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आपल्या प्रभावी भाषणांमुळे ओळखले जाणार राज ठाकरे यांच्या या लूकची महाराष्ट्रातील तरुणांमध्ये चांगलीच चर्चा आहे. राज ठाकरे यांचा हा नवा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे महाराष्ट्राला तसे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये अनेकदा दिसतात. पण या फोटोमध्ये ते जिन्स आणि टिशर्टमध्ये दिसत आहेत. तरुणांमध्ये राज ठाकरे यांची अधिक क्रेज आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशात राज ठाकरे यांचे अनेक चाहते आहेत. राज ठाकरे यांची भाषणाची शैली अनेकांना आवडते. पण सध्या राज ठाकरे यांचा हा लूक अनेकांना आवडत आहे.



कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे गेले काही महिने सर्वकाही बंद होतं. या दरम्यान अनेक नेत्यांचे लूक बदलले आहेत. त्यामध्ये आता राज ठाकरे यांचा हा लूक अधिक लोकांना आवडत आहे.