मुंबई : राज्यात काही बँकांचे घोटाळे बाहेर येत आहेत. तसेच राज्य आणि देशातील काही बँका बुडीत निघाल्या आहेत. अनेकांचे पैसे अडकले. त्यामुळ नवा पेच निर्माण झाला आहे. लोकांचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यामुळे सार्वजनिक महामंडळांनी राष्ट्रीयकृत बँकेतच पैसे जमा करावेत, असा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. १ एप्रिलपासून खासगी तसेच सहकारी बँकेतील खाती बंद करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे  अ‌ॅक्सिस बँकेला मोठा फटका  बसणार आहे. , पंजाब नॅशनल बँक, येस बँक यांच्या व्यवहारात अनियमितता आढळून आली आहे. तसेच  बँकांना कर्जाच्या माध्यमातून गंडा घातला गेला आहे. कर्ज वसुली न झाल्याने आणि  बँकेची  व्यवहारात अनियमितता यामुळे रिर्झव्ह  बँकेने निर्बंध लादले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही धोका होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला. त्याबाबत शासन अध्यादेश जारी केला आहे.


सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आदींनी त्यांच्याकडील सर्व बँकिंग विषयक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच करण्यात यावेत. तसेच यापूर्वी खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी (वेतन व भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्यासाठी उघडण्यात आलेली बँक खाती १ एप्रिल, २०२०पासून बंद करावीत. आणि केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावीत, असे या शासन परिपत्रकात म्हटले आहे. 


१ एप्रिल, २०२०पासून कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते यासाठी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमधील खात्यात जमा करण्याचे स्पष्ट म्हटले आहे. तर निवृत्ती वेतनधारकांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांची बँक खाती त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकामध्ये उघडली आहेत. तथापि, त्यांनीही निवृत्ती वेतन बँक खाती राष्ट्रीयकृत बँकामध्येच उघडण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे.