Mumbai News : मुंबईसारख्या शहरामध्ये दर दिवशी ये- जा करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. मोठ्या प्रमाणात याच शहरातून दर दिवशी आर्थिक उलाढाली केल्या जातात. याच मुंबईशी आता जवळील शहरंही जोडली जात असून, रस्तेमार्गाच्या माध्यमातून नव्यानं काही नगरं वसवण्याचा प्रयत्न एमएमआरडीए आणि तत्सम संस्थांच्या वतीनं केला जात आहे. शहरालगत असणाऱ्या भूभागांमध्ये विकासाच्या संधी पाहता आता नवी मुंबईच्या जवळ आणखी एका शहराची निर्मिती केली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवडीपासून सुरू होणारा मुंबई-पारबंदर प्रकल्प (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) (Navi Mumbai) नवी मुंबईत जिथं संपतो तिखंच एका नव्या शहराचा विकास केला जाणार आहे. एका दैनिकाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी असणाऱ्या डॉ. संजय मुखर्जी यांनी यासंदर्भातील घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधलं. 


हेसुद्धा पाहा : तब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त 


मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं काम अखेरच्या टप्प्यात असून, त्यामुळं अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्येच नवी मुंबई गाठणं शक्य होणार आहे. शिवाय याच मार्गानं पुढे लगेचच तुम्ही या नव्यानं वसवलेल्या महानगरामध्येही पोहोचू शकणार आहात. भविष्याच्या दृष्टीनं नवी मुंबईजवळील या नव्या महानगरामुळं आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीला चालना मिळणार आहे. 


मुंबई पुन्हा विस्तारणार... आता कुठपर्यंत असेल सीमा? 


इथं एक्स्प्रेस वे आणि तत्सम मार्गांनी शहराचा बहुंताश भाग जोडला गेला असतानाच आता MMRDA कडून वसई- विरार सागरी सेतूचं बांधकामही हाती घेण्यात आलं आहे. साधारण 45 किमीच्या या सागरीसेतूचं अंतर अंतर्गत जोडरस्ते मिळून 95 किमी पर्यंत पोहोचणार आहे. हे एकंदर अंतर पाहता हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असेल.