मुंबई : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार याची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. या पदावर सुबोध जयस्वाल हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे संचालक संजय बर्वे देखील मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या स्पर्धेत आहेत. सुबोध कुमार जयसवाल यांची अद्याप पाच वर्षांची सेवा बाकी असून बर्वे हे पुढच्या ऑगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचे मुंबई पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार असली तरी येत्या ऑगस्ट महिन्यात ते देखील निवृत्त होणार आहेत. पडसळगीकरांना कार्यकाळ वाढवून न मिळाल्यास पुन्हा एकदा पोलीस दलात फेरबदल होऊ शकतात...


महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक सतिश माथुर हे आज पोलीस दलातून निवृत्त झालेत. मुंबईच्या नायगाव येथील पोलीस मैदानात त्यांचा निवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी पोलीस दलातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. सोहळ्यातील मुख्य आकर्षन म्हणजे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महासंचालकांचं वाहन ओढत त्यांना निरोप दिला.