मुंबई : मुलुंडमधील रिया पालांडे आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. २३ नोव्हेंबर रोजी रिया पालांडे हिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी आणि त्यांच्या पत्नी भारती चौधरी जबाबदार असल्याची सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्या दिवसापासून ते दोघंही फरार आहेत. आता याप्रकरणी दामोदर चौधरी यांच्या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केलाय. यात निलाक्षीनं आपल्या आई-वडिलांना आयपीएस लॉबी अडकवत असल्याचा आरोप केलाय.


तसेच पोलीस यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांवरील विश्वास उडाला असून आपण आत्महत्या करत असल्याचं तिने व्हिडीओत सांगितलंय. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर निलाक्षीने तिचा मोबाईल बंद केला असून तिचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे फरार असलेल्या चौधरी दांमपत्यांचा शोध लागत नसताना त्यांच्या मुलीने व्हिडिओ व्हायरल केल्याने हे प्रकरण आणखीन गुंतागुंतीचं झालंय.