मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना नव वर्षांत नवीन गणवेश मिळणार आहे. नवीन गणवेशासाठी तब्बल ६४ कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यामुळे काहींनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेय. आधी एसटीची परिस्थिती बदला नंतर हा खर्च करा, असा सल्लाही देण्यात आलाय.


कर्मचारी अधिक स्मार्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचारे हे अनेक वर्षानुवर्षे खाकी गणवेशात दिसत होते. आता नवीन कपडे मिळणार आहेत. ६ जानेवारीपासून राज्यभरातील एसटीच्या विविध कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना नवीन गणवेशांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे एसटीचे कर्मचारी अधिक स्मार्ट होणार आहेत.  


येथे तयार झाला गणवेश


दरम्यान, हा गणवेश अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीने (एफआयएफटी) खास डिझाइन केला आहे. चालक, वाहक ते कारागीर पर्यंतच्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांचे मत जाणून हा नवा गणवेश तयार करण्यात आलाय.


एसटीतील ६९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे गणवेशबदल करण्यात आलाय. गणवेशाबरोबरच सुरक्षेप्रमाणेच बेल्ट, बूटदेखील दिले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.