मुंबई : घोडबंदर नजीकच्या नवीन वर्सोवा पुलाच्या दुरुस्ती कामासाठी अखेर मुहूर्त सापडलाय. आजपासून नव्या वर्सोवा पुलाची एक लेन बंद करण्यात आलीय. तर त्याच्या बाजूची एक लेन हलक्या वाहनांसाठी सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जड-अवजड वाहतुकीला २५ डिसेंबरपर्यंत मनाई करण्यात आली आहे. मात्र हायवे अॅथोरिटी आणि राज्यमार्ग पोलीस यांच्यात समन्वय नसल्याने तब्बल दहा दिवसांनी लेन बंद करण्यात आली. पुलावरून अवजड वाहन जाऊ नये म्हणून पुलावर बॅरेकेट बसवण्यात आलेत. 


सध्या त्यामुळे विरारचा शिरसाट फाटा, वसई फाटा आणि ससुनवघर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. वाहतूक संथ गतीने सुरु आहे.