मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र एक तरुणीने दाखवून दिलं आहे. तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुणीने पावसाळ्यात मुंबईच्या होणाऱ्या तुंबईचं वास्तव दाखवून दिलं आहे. व्हिडीओमध्ये तरुणीने, 'काय तो पाऊस, काय ते तुंबेले पाणी...काय ते मुंबईचं ट्राफिक आणि बीएमसी एकदम ओकेमध्ये..' असं म्हणत बीएमसीची पोलखोल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. यापूर्वी देखील आरजे मलिष्काचं मुंबई महानगरपालिकेवरचं गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणे मुंबईची तुंबई झालेल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून आलं आहे.