पश्चिम रेल्वेवर आज नाईट ब्लॉक
`मुंबई लोकल` ही मुंबईकरांंची लाईफलाईन समजली जाते. अनेकांंचं टाईमटेबल रेल्वेच्या वेळापत्रकानुसारच आखलेले असते.
मुंबई : 'मुंबई लोकल' ही मुंबईकरांंची लाईफलाईन समजली जाते. अनेकांंचं टाईमटेबल रेल्वेच्या वेळापत्रकानुसारच आखलेले असते.
मुंबईकरांंचा विकेंड मात्र 'मेगा ब्लॉग'मुळे अनेकदा बिघडतो. एरवी रविवारी सकाळी ११ नंतर मेगाब्लॉग सुरू होतो. मात्र या आठवड्यामध्ये पश्चिम रेल्वेवर रात्री मेगा ब्लॉग घेण्यात आला आहे.
कधी आहे पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉग ?
पश्चिम रेल्वे मार्गावर आज नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे.
वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान रात्री 12.15 ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत अप धीम्य तर रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
ब्लॉक दरम्यान वसई रोज ते विरार दरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे.