पश्चिम रेल्वेवर आज नाईट ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर आज नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर आज नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत अप धीम्य तर रात्री १ ते पहाटे 5 वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान वसई रोज ते विरार दरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे.