२६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार
२६ जानेवारीपासून मुंबई २४ तास सुरू राहणार
मुंबई : २६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या बैठकीला मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते. तसंच हॉटेल आणि मॉल मालकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला हिरवा कंदील मिळाला आहे. याआधीच आदित्य ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. पण फडणवीस सरकारने याला महत्त्व दिलं नाही.
नाईट लाईफचं हे चित्र आता लवकरच मुंबईत दिसणार आहे. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर हॉटेल व्यावसायिक, मॉल्सचे प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाईट लाईफचा आढावा बैठक घेतली. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
या निर्णयाचं अनेक संघटनांकडून स्वागत ही होत आहे. नाईट लाईफमुळे रोजगार वाढेल अशी प्रतिक्रिया 'आहार' या संघटनेने दिली आहे.