Business News : (Indias Wealthiest people) श्रीमंतीच्या बाबतीत देशातील काही व्यक्तींची नावं घ्यायची झाल्यास ही यादी सहसा डोळ्यांसमोरच असते. (Gautam Adani, Mukesh Ambani, Ratan tata, Birla) अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला ही त्यातलीच काही नावं. सध्याच्या घडीला यातलंच एक नाव बरंच चर्चेत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात त्यांच्या Reliance Industries Limited नं घेतलेली झेप आणि त्याला मिळालेली नव्या पिढीच्या कल्पनांची जोड.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स समुहाच्या या यशामध्ये आणखी एका व्यक्तीचं नाव आहे, ज्यांच्या प्रयत्नांमुळं आणि रणनितीमुळं हा समूह इतक्या उंचीवर पोहोचू शकला आहे. या व्यक्तीचं नाव आहे, निखिल मेसवानी (Nikhil Meswani ) . निखिल हे अंबानी यांचे नातेवाईक आहेत. 1986 मध्ये त्यांनी या कंपनीशी नातं जोडलं आणि 1988 मध्ये त्यांना executive director या पदी नियुक्त करण्यात आलं. 


कुठे शिकलेयत निखिल? 


अमेरिकेतील Massachusetts विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते मायदेशी, भारतात परतले आणि इथं त्यांनी रिलायन्स समुहात नोकरी सुरु केली.  project officer या पदापासून त्यांच्या नोकरीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 1997 ते 2005 या कालावधीत त्यांनी रिलायन्स रिफायनरीचा संपूर्ण कारभार सांभाळला. अंबानींच्या मालकिच्या मुंबई इंडियन्स या क्रिकेट फ्रँचायझीचे ते मॅनेजर आहेत. 


हेसुद्धा वाचा : VIDEO : अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन! Nita आणि Mukesh Ambani पुन्हा होणार आजी - आजोबा


 


कंपनीनं टेलिकॉम क्षेत्रात केलेल्या प्रगतीचं मोठं श्रेय निखिल मेसवानी यांना दिलं जातं. शिवाय रिटेल क्षेत्रात रिलायन्सला मिळणारी प्रसिद्धीसुद्धा त्यांच्यामुळेच आहे असंही म्हटलं जातं. जगविख्यात उद्योजक रसिकलाल मेसवानी यांचे पुत्र निखिल मेसवानी रिलायन्स उद्योग समुहाचा कणा आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


अंबानींपेक्षाही जास्त पगार? (Mukesh Ambani Salary)


2021-22 या आर्थिक वर्षात मेसवानी यांनी 24 कोटी रुपये कमवले होते. फोर्ब्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार खुद्द मुकेश अंबानी हेसुद्धा मेसवानी यांच्याहून कमी पगार घेतात. जवळपास 10 वर्षांहून अधिक काळापासून मुकेश अंबानी यांच्या पगाराचा आकडा 15 कोटींच्याच घरात राहिला आहे. किंबहुना कोविड काळात अंबानी यांनी त्यांच्या पगारावरही पाणी सोडलं होतं. अगदी बरोबर वाचत आहात तुम्ही, रिलायन्समधील कागदपत्रांनुसार त्यांच्या पगारापुढे ‘nil’ असं लिहिण्यात आलं असल्याचं वृत्त FE या संकेतस्थळानं प्रसिद्ध केलं आहे.