हिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित
पंजाब नॅशशल बँकेच्या साडे अकरा हजार रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरा व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलंय.
मुंबई : पंजाब नॅशशल बँकेच्या साडे अकरा हजार रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरा व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलंय.
सीबीआय आणि ईडीने सुरू केलेल्या चौकशीत बऱ्याच गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. नीरव मोदीच्या सर्व कार्यालयं आणि दुकानांवर धाडी पडल्या आहेत.
एकूण नऊ ठिकाणी ईडीचे छापे पडले आहेत. मुंबईत ४, दिल्लीत २ आणि सुरतमध्ये ३ ठिकाणी ही कारवाई करण्यात आलीय.
अधिक वाचा : नीरव मोदीच्या मालकीच्या ९ ठिकाणी छापे
मोदींचं कुटुंब अगोदरपासूनच देशाबाहेर
दरम्यान पंजाब नॅशशल बँकेतल्या अपहाराप्रकरणातला प्रमुख आरोपी नीरव मोदी देशाबाहेर असल्याचं समोर आलंय. १६ जानेवारीला सर्वप्रथम हे प्रकरण पुढे आलं. पण नीरव मोदी आणि त्याचं कुटुंब त्या आधीपासूनच देशाबाहेर असल्याचं पुढे आलंय. मोदी कुटुंब युरोपातल्या एका देशात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
तिकडे मेहुल चोकसी हा नीरव मोदीचा मामा असून देशातली प्रसिद्ध हिरे व्यापारी कंपनी गितांजली ज्वेलर्स मेहुल चोकसीच्या मालकीची आहे. या दोघांनी मिळून हा घोटाळा केल्याचं उघड झालंय.
अधिक वाचा : 'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार
एफआयआर दाखल, अटक नाहीच
याप्रकरणी सीबीआयनं बडा हिरा व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केलीय. या प्रकरणी आतापर्यंत पंजाब नॅशनल बँकेच्या १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. या अपहार उघड झाल्यावर पंजाब नॅशनल बँकेनं सेबी आणि मुंबई शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांना बुधवारी लेखी पत्राद्वारे माहिती कळवलीय. झालेल्या अपहारानंतर पंजाब नॅशनल बँकेनं देशातल्या सर्व बँकांनाही अशा अपहारांबद्दल सावधानतेचा इशारा दिलाय. अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही.