मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातल्या मुख्य आरोपी असलेला हिरेव्यापारी नीरव मोदीच्या घरातून जप्त केलेल्या महागड्या आणि दुर्मीळ चित्रांचा आज लिलाव होणार आहे. लिलाव रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो रुपयांची पेंटिंग्ज नीरव मोदीच्या मालकीची नाहीत. ही पेंटिंग्ज रोहिन ट्रस्टची आहेत, असा दावा त्याचा मुलगा रोहिन मोदी यांनी केला आहे. लिलावापूर्वी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता चित्रांच्या लिलावाबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.



नीरवचा मुलगा रोहिनने ही याचिका केली होती. चित्रांचा लिलाव केल्यानंतर त्यातून आलेले पैसे एका स्वतंत्र बँक खात्यात जमा ठेवावे आणि त्याचा वापर करू नये. तसेच याचिकेविषयी २३ मार्चपर्यंत उत्तर दाखल करावे, असे निर्देशही खंडपीठाने ईडीला दिले आहे.


0