मुंबई : Mumbai Nirbhaya case : अत्याचार करण्यात आलेल्या मुंबईतील निर्भयाचा उपचारादरम्यान, रुग्णालयात मृत्यू झाला. ही पीडित महिला मृत्यूशी झुंज देत होती. महिलेवर बलात्कार करून त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळी सारखी वस्तू घुसवून तिला गंभीर जखमी केले होते. (Nirbhaya-like horror in Mumbai, woman raped and brutally assaulted with iron rod in private parts) ती मृत्यूशी झुंज देत होती. दरम्यान, अत्याचार करण्याला पोलिसांनी अटक केली आहे.  


निर्भयाप्रकरणी कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल - गृहमंत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील निर्भयासारखी धक्कादायक घटना काल रात्री मुंबईत घडली. याबाबत संताप व्यक्त होत आहे. मुंबई शहरातील साकीनाका भागात महिलेवर बलात्कार (Women Rape) करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची (Women) प्रकृती चिंताजनक झाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. (Mumbai woman raped inside tempo)


दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई करणार, असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. साकीनाक्यात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. 



अखेरचा घेतला श्वास


साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय चीड आणणारा प्रकार उघडकीस आला. महिलेवर बलात्कार करून त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळी सारखी वस्तू घुसवून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर ही पीडित महिला आता मृत्यूशी झुंज देत होती. सकिनाका खैरनी रोड येथील एका स्टुडिओजवळ एका टेम्पोत हा सर्व प्रकार घडला होता. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार घडला होता.


रात्री तीन वाजताच्या दरम्यान पोलीस कंट्रोल रुमला फोन आला. एका महिलेला कोणीतरी मारत असून ती गंभीर जखमी आहे. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.


डॉक्टरांनी या महिलेची तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडितेचा मृत्यू झाला.