Ambani Car Collection:  उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. मुकेश अंबानी यांची इतकी संपत्ती आहे, की तुम्ही कधी त्याची कल्पनाही करू शकत नाही. देशभरात अंबानी कुटुंब हे त्यांच्या संपत्तीसाठी ओळखले जाते. अंबानी यांच्याकडे असणाऱ्या लक्झरी कार आणि डायमंड कलेक्शन बद्दल सर्वांनाच माहिती आहे. अनेक वेळा आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याकडे असणाऱ्या महागड्या गाड्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात महागडी कार कोणाकडे? 


अंबानी कुटुंबाकडे अनेक असंख्य महागड्या गाड्या आहेत. ज्यांची नावे तुम्ही ऐकली ऐकली नसतील. पण अंबानी कुटुंबातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे. त्या कारचे नाव काय आहे. हे तुम्हाला माहिती आहे का?


देशातील सर्वात महागडी कार उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे असेल, असे अनेकांना वाटत असेल. पण तसे नाही. जगातील सर्वात महागडी कार ही मुकेश अंबानी यांच्याकडे  नसून ती कार त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे आहे.


नीता अंबानींकडे कोणती आहे कार? 


नीता अंबानी यांच्याकडे Audi A9 Chameleon नावाची कार आहे. जी संपूर्ण भारतातील सर्वात महागडी कार आहे. डीएनए रिपोर्टनुसार या कारची किंमत 90 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. हे विशेष वाहन सुमारे 600 अश्वशक्तीच्या शक्तिशाली इंजिनसह येते.


कारची वैशिष्ट्ये काय?  


सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही बटन दाबून तिचा रंग बदलू शकता. स्पॅनिश डिझायनर डॅनियल गार्की यांनी बनवलेली ही कार इलेक्ट्रॉनिक पेंट सिस्टमने सुसज्ज आहे.  जगभरात अशी केवळ  11 वाहने विकली गेली आहेत. त्यापैकी एक नीता अंबानी यांच्या गॅरेजमध्ये उभी आहे. त्याच वेळी, मुकेश अंबानी यांच्या मालकीची सर्वात महागडी कार BMW 760 Li Armoured आहे. हे बुलेटप्रूफ वाहन विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी सज्ज आहे.