मुंबई : 'साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे' अशा असं लिहिलेला व्हॉट्सअॅप डीपी नितेश राणे यांनी ठेवला आहे. त्यामुळे भाजपकडून देण्यात आलेली ऑफर राणे स्वीकारणार नसल्याचं म्हटलं जात आहे, राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. नारायण राणे यांना भाजपने दिलेल्या ऑफरनंतर नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.


नितेश राणे यांचं ट्विट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“महाराष्ट्राच्या राजकारणात राणेसाहेबांची गरज आहे. अजून बराच काळ ते महाराष्ट्रातच रहावेत अशी आमच्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना विधानसभेत पाहू इच्छितो, राज्यसभेत नाही. आशा आहे ते समजून घेतील”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.


भाजपकडून राज्यसभेची ऑफर: राणे


मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली.  मला मंत्रिपद देण्याबाबत उशीर का होतोय, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना विचारा. मला त्याबाबत माहिती नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत याविषयी चर्चा झाल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.