मुंबई: जे शिवरायांच्या पुतळ्यावर छत्र उभारू शकत नाहीत, त्यांची अयोध्येत राम मंदिर काय बांधायची लायकीच नाही, असा सणसणीत टोला नितेश यांनी शिवसेनेला लगावला. ते शुक्रवारी मुंबई विमानतळाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. पश्चिम द्रुतगती महामार्गानजीक असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्यावर छत्र उभारण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी शिवसेनेने केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. अखेर आज नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या पुतळ्यावर तात्पुरते छत्र उभारत शिवसेनेवर कुरघोडी केली. 



यानंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, उद्धव ठाकरे नेहमी भगव्याचं राजकारण करण्यात आले. आता ते अयोध्येला जाऊनही तेच करत आहेत.
मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करताना उद्धव ठाकरे म्हटले होते की, शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे. तुमची कुवत नसेल तर सांगा शिवसेने इथे रायगड उभा करेल. चार मार्चला पुतळ्याचं पूजन करून शिवसेनेने शिवजयंतीही साजरी केली होती. मात्र छत्र उभारण्याचा बहुदा शिवसेनेला विसर पडला असावा. राम मंदिर उभारण्याची त्यांची कुवत नाही, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.