मुंबई : Nitesh Rane on Disha Salian and Sachin Vaze connection : दि्वंगत अभिनेता सुशांत राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. या दोघांचे कनेक्शन असल्याचे तसे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (Nitesh Rane's tweet Disha Salian and Sachin Vaze connection) या आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही दिशा सालियानवर जाहीर भाष्य केले. आता नितेश राणे यांनी ट्विट केल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Narayan rane on Sushant singh rajput case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा सालियान हिला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आली, ती वाझेची आहे का?  नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. दिशाला आठ तारखेच्या रात्री (8 जून 2020 दिशा सालियान हिचा मृत्यूचा दिवस) ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 



सचिन वाझे याच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे. जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझे याला पोलीस दलात 9 जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आले होते. कनेक्शन?, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.



मालवणी पोलीस ठाण्याने निष्पक्ष तपास न केल्याने प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. बरोबर?  आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले? ते कितपत न्याय्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? आदी प्रश्न ट्विट करत नितेश राणे यांनी उपस्थित केले आहे.


त्याआधी 'दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाली आहे. त्याच प्रकरणात पुढे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता.