विधानसभेत अनिल परब विरुद्ध नितेश राणे शाब्दिक चकमक
Maharashtra Winter session : परिवहनमंत्री अनिल परब आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात प्रश्नोत्तराच्या तासात शाब्दिक चकमक दिसून आली.
मुंबई : Maharashtra Winter session : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक दिसून आलेत. सरकारला घेण्याची विरोधकांनी तयारी केली होती. त्याचवेळी सत्ताधारीही आक्रमक दिसून आले. परिवहनमंत्री अनिल परब आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात प्रश्नोत्तराच्या तासात शाब्दिक चकमक दिसून आली. (Nitesh Rane vs Anil Parab in Maharashtra Legislative Assembly)
अनिल परब आणि आमदार नितेश राणे यांच्यामध्ये आसनव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन वाद झाला. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत प्रकरण अधिक ताणणार नाही याची काळजी घेत वाद मिटवला.
विधानसभेत अनिल परब एका प्रश्नाचे उत्तर देत असताना नितेश राणे उठून उभे राहिले आणि मध्ये बोलायला लागले. नितेश राणे त्यांच्या जागेवर बसले नव्हते. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना मी उत्तर देतोय हे मध्येच प्रश्न कसा विचारतायेत, असा आक्षेप अनिल परब यांनी घेतला. तसेच नितेश राणे आपल्या जागेवर नसल्याचा आक्षेपही अनिल परब यांनी घेतला होता.
नक्की काय झाल?
अनिल परब यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत असतानाच नितेश राणे हे आपल्या जागेवरुन उठून त्यांना प्रश्न विचारला. त्यावर मंत्री परब यांनी तुमची प्रश्न विचारण्याची वेळ आली की प्रश्न विचारा, असे बजावले. त्यानंतरही नितेश राणे ओरडून बोलत असल्याने परब यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी यांच्या निर्दशनास आणून दिले. नितेश राणेंना समज द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर नितेश राणे यांनी पुन्हा मोठ्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर परब यांनी नितेश राणे त्यांच्या जागेवर बसलेले नाही, हे स्पष्ट केले. यावरुन वादाची ठिणगी पडली.