मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन
आज आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन रस्ते, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं.
मुंबई : आज आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन रस्ते, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं.
पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार
या टर्मिनलमुळे देशातील 80 टक्के क्रूझ प्रवासी वाहतूक मुंबईतून होणार आहे. वर्षाला 7 लाख प्रवासी वाहतूक नवीन क्रूझ टर्मिनलमधून अपेक्षित आहे. यामुळे देशाच्या महसूलमध्ये वाढ होईलच. पण मुंबई येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.
अतिभव्य क्रूझ उभं राहू शकणार
नवीन क्रूझ टर्मिनलचा प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन क्रूझ टर्मिनल हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळा प्रमाणे असणार आहे. तर 5 हजार प्रवासी वाहून नेणारे अतिभव्य क्रूझ इथे उभे राहू शकेल अशी या नवीन क्रूझ टर्मिनलची क्षमता असणार आहे.
पाहा व्हिडिओ