सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनिल तटकरेंची चौकशी सुरू
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांना क्लीन चीट देण्यात आलेली नाही.
मुंबई : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांना क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी एक आरोपपत्र दाखल झालं आहे.
सुनिल तटकरे यांच्या चौकशीबाबत न्यायालयानं विचारले असता त्यांची चौकशी सुरु असल्याचं एसीबीनं विशेष एसीबी न्यायालयाला सांगितलं. सिंचन घोटाळा प्रकरणी ७ बड्या अधिका-यांविरोधात ठाणे एसीबीने आरोप पत्र दाखल केलंय.
३ हजार पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र असून जवळपास ५० पेक्षा जास्त साक्षादारांची साक्ष या आरोपपत्रात नोंदवण्यात आलीये. सुनील तटकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एसीबी आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. गेली अनेक वर्ष फक्त चौकशीच सुरू असून अद्याप कोणताही निष्कर्ष न निघाल्याने उच्च न्यायालयाने बुधवारी एसीबी आणि ईडीला चांगलेच खडसावले होते.