मुंबई : राजभवनावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतरही मुंबई विद्यापीठाच्या निकालांची अंतिम तारीख ठरलेली नसल्याचं स्पष्ट झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच निकाल लावणार असल्याचा विश्वास उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसंच पुनर्मुल्यांकनासाठी पर्यायी व्यवस्था करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल उशिरा लागला आणि तो मेरीटमध्ये असेल तर त्याला प्रवेश दिला जाणार असल्याचंही तावडेंनी नमूद केलंय. 


ज्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत तेवढेच निकाल जाहीर करता येतील का?  याबाबत बोर्ड ऑफ एक्झामिनेशन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ९० टक्के निकाल जाहीर झाल्याचा दावा त्यांनी केलाय.