मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे (NCP) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे बलात्काराच्या आरोपानंतर अडचणीत सापडलेले असताना दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अभय देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नबाव मलिकांवर थेट आरोप झालेले नाहीत, असे पवार म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Ncb च्या अटकेत असलेला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानच्या वांद्रे इथल्या घरावर आज Ncb ने छापे मारले. वांद्रे इथल्या लामोर नावाच्या घरावर आज सकाळी 6 वाजल्यापासून छापे सुरु आहेत. इथे समीर खान राहतो आणि त्याचं ऑफिस देखील आहे. समीर खानने दोन राजकीय नेत्यांशी व्हाट्सअप्पवरून चॅट केले असून त्याचा तपासही केला जाईल, आशी माहिती Ncbच्या सूत्रांनी दिली. यावरुन पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितेल की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरुप गंभीर आहेत. पक्ष म्हणून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच तक्रारीचे स्वरुप गंभीर असल्याचे सांगत सूचक वक्तव्य केले आहे.


तर दुसरीकडे राजीनाम्याबद्दल पक्ष निर्णय घेईल, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सगळी माहिती दिलेली आहे. राजीनाम्याबद्दल पक्ष काय तो निर्णय घेईल, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. तर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेत. पक्षातल्या लोकांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढल्याचे कळत आहे.