मुंबई विद्यापीठावर नामुष्की, तिसरी डेडलाईनही टळली
पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची मुंबई विद्यापीठाची तिसरी म्हणजेच १५ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.
मुंबई : पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची मुंबई विद्यापीठाची तिसरी म्हणजेच १५ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.
३१ जुलै, ५ ऑगस्ट आणि आता १५ ऑगस्ट... या तिन्ही तारखा टळल्या तरी पदवीचे सर्व निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आलंय. एकूण ४७७ पैकी ३३३ परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर झालेत. अजूनही १४४ परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने कॉमर्स आणि लॉचे निकाल रखडलेत. त्यामुळे हे निकाल कधी लागणार याची प्रतिक्षा लाखो विद्यार्थ्यांना आहे.
दरम्यान, निकाल लवकरात लवकर जाहीर व्हावे यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टी दिवशीही २४५ प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम केले. मात्र, निकाल जाहीर होत नसल्याने मुंबई विद्यापीठ प्रशासनावर मात्र तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होतेय.
त्यामुळे कुलपती सी. विद्यासागर राव सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्याबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.