मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निकालाच्या घोळाला जबाबदार धरुन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. पण अद्यापही त्यांच्यावर 'टांगती तलवार' कायम असून त्यांचा विद्यापीठात परतण्याचा मार्ग फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार आहे.


विद्यापीठात पुन्हा रुजू होण्यासाठी डॉ. संजय देशमुख यांनी राज्यपालांकडे अर्ज केला होता. पण राजभवनातून अद्याप त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सर्व निकाल लागल्यानंतरही डॉ. देशमुखांच्या परतीचा मार्ग धूसर दिसत आहे. विद्यार्थी संघटना, राजकिय पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामूळे या वाढत्या दबावामूळे ते स्वत: राजीनामा देणार की त्यांना काढून टाकले जाणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या कामास जबाबदार असणाऱ्या मेरिट ट्रक कंपनीकडेच पुढील कामही देण्यात आले आहे द्वितीय सत्राच्या परीक्षा ३ ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.त्यामूळे हे निकाल वेळेत जाहीर होतील का हा प्रश्न विचारला जात आहे.