दिवाळीत रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दिलासा
४ नोव्हेंबरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी ४ नोव्हेंबरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना थोडा का होईना पण दिलासा मिळालाय.
रविवारी केवळ हार्बर मार्गावर स. ११.४० ते दु. ४.१० ब्लॉक आहे. मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारऐवजी आज, शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
तसेच, इगतपुरी येथे सिग्नल यंत्रणा नव्याने तयार करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्री ११.५० ते पहाटे रविवारी पहाटे २.५० पर्यंत, वसई ते वैतरणा स्थानकामध्ये अप आणि रा. १.२५ ते दु. ४.२५ पर्यंत डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
त्यामुळे लोकल सेवांवर परिणाम होणार नसून मेल, एक्स्प्रेस गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील.