नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत रावसाहेब दानवे सकारात्मक
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. जर पक्षात कोणाला प्रवेश करायचा असेल तर पक्षाला कोणतीही अडचण नाही, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केली आहे.
राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झालीय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी त्याआधी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतंय.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं सरकारची बदनाम होत असल्यानं काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. त्यानंतर 8 ते 10 दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील. त्याआधी काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपात प्रवेश करतील, अशी चिन्हं आहेत. राणेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून, महत्त्वाचं खातं दिले जाईल, असं भाजपमधील सूत्रांचं म्हणणं आहे.
पाहा काय म्हणाले रावसाहेब दानवे