हागणदारीमुक्त मुंबई केवळ कागदावरच
हागणदारीमुक्त मुंबई केवळ कागदावरच झाली असल्याचे वास्तव मुंबईतल्या महिलांनीच पुढं येवून मांडलंय. कोरो राईट टू पी या संस्थेने आजच्या जागतिक शौचालय दिवसाच्या निमित्तानं बीएमसीची पोलखोल केलीय.
कृष्णात पाटील, झी मिडिया मुंबई : हागणदारीमुक्त मुंबई केवळ कागदावरच झाली असल्याचे वास्तव मुंबईतल्या महिलांनीच पुढं येवून मांडलंय. कोरो राईट टू पी या संस्थेने आजच्या जागतिक शौचालय दिवसाच्या निमित्तानं बीएमसीची पोलखोल केलीय.
मुंबई महापालिका जरी मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा करत असले तरी वास्तव मात्र नेमकं उलट आहे. सार्वजनिक शौचालयांच्या कमतरता असल्यामुळं रेल्वे रुळांवर, उघड्या जागांवर अजूनही शौचास जाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. तसंच जी सार्वजनिक शौचालये आहेत, त्यांची प्रचंड दुरावस्था झालीय. बीएमसीकडं वारंवार पाठपुरावा करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे महिलांचे म्हणणं आहे.
लोकसंख्या अधिक आणि शौचालयांची संख्या कमी हे चित्र मुंबईत सर्वत्र पाहायला मिळते. तसंच महिला, मुली शौचास बाहेर गेल्यानंतर त्यांची छेडछाड होण्याचे प्रमाणही अधिक असल्यानं शौचालयांची संख्या अधिक प्रमाणात वाढवण्याची गरज महिला व्यक्त करतायत.
मुंबईतील केवळ एम वॉर्डमध्ये नव्हे तर सर्वच वॉर्डमधील झोपडपट्टी परिसरामधील हे वास्तव आहे. ही वस्तुस्थिती मान्य करून शौचालयांची समस्या दूर करण्यासाठी पालिकेनं पुढं येण्याची गरज आहे.