मुंबईकरांच्या मालमत्ता कर सुटीची शिवसेनेला पुन्हा आठवण
मुंबईकरांना मालमत्ता करात सूट आणि सवलत देण्याच्या वचनाची शिवसेनेला पुन्हा आठवण झालीय.
मुंबई : मुंबईकरांना मालमत्ता करात सूट आणि सवलत देण्याच्या वचनाची शिवसेनेला पुन्हा आठवण झालीय. या संदर्भात उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिल्यावर सभागृह नेत्यांनी ठरावाची सूचना महापौरांना दिलीय.
५०० चौरस फुटांखालील निवासी घरांना पूर्ण मालमत्ता कर माफ तर ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात ६० टक्के सवलत देण्याच्या ठरावाची सूचना शिवसेना गटनेत्यांनी महापौरांना दिलीय.
ही सवलत दिल्यावर मुंबई महापालिकेला शेकडो कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागणार आहे. एकीकडे जीएसटीमुळे जकात बंद होत असताना दुसरीकडे मालमत्ता करातही सवलत दिल्याने पालिकेला उत्पन्नाचा नवा मार्ग शोधावा लागणार आहे.