मुंबई : राज्यातील कोकण महसूल विभाग वगळता बावन्न तालुक्यात पावसाने दडी मारली आहे . या तालुक्यात पन्नास टक्क्याहून कमी पाउस झाला आहे. यात औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्यात सर्वाधिक तालुक्यात संकट आहे. तर त्यामागे अमरावती महसूल विभगातील पंधरा तालुक्याठी हे संकट उभे ठाकले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर आणि पुणे विभागात तुलनेत कमी असला तरी तेथील आठ आणी पाच तालुक्यात खूप कमी पाउस नोंदविण्यात आल्याने दुबार पेरणीचे संकट येथील तेरा तालुक्यातील शेतकर्यासमोर आहे. 


विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने मराठवाडा, मुंबई आणि नासिकच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी येथील मालेगाव तालुक्यासह चार तालुके  कमी पावसाच्या आकडेवारीत आले आहेत. हे सर्व तालुक्यात २५ ते ५० टक्के दरम्यान असून २५ टक्क्याखाली राज्यातील एकही तालुका नसला तरी भीषणसंकट कायम आहे