खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अभाव
महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला असला तरी दोन पावसामधील खंड पिकांना मारक ठरतो आहे.
धुळे : जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची परिस्थिती दयनीय झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात सरासरी इतका पाऊस पडला असला तरी दोन पावसामधील खंड पिकांना मारक ठरतो आहे.
आज पिके हिरवीगार दिसत असली तरी त्यांची अपेक्षित वाढ झाली नाही. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर तुरळक पाऊसावरच जिल्ह्यातील पीक तग धरून आहेत.
औरंगाबाद : यंदाही मराठवाड्यात दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी तो अंदाज काही खरा ठरला नाही.जुलैमहिन्यात तर मराठवाड्यामध्ये पावसाचा केवळ 9 दिवसच मुक्कम होता आणिे तोही काही ठिकाणी तुरळक झाला. पावसाने दडी मारल्यामुळे यंदा मराठवाड्यातील खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे..
अमरावती : पावसाळा सुरू होऊन 2 महिन्याचा कालावधी उलटुन गेल्यानंतरही अमरावती जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील मोठ्या ,मध्यम आणि लघु प्रकल्पात जलस्तर अजूनही समाधान कारक झालेला नाही .
अमरावती शहरासह ,पंचतारांकित MIDC ला पाणीपुरवठा करणारे वर्धा नदीवरील जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पामध्ये 40 ℅ जलसाठा आहे तर जिल्ह्यातील 4 मध्यम प्रकल्पामध्ये 36 .27 %जलसाठा आहे आणि 46 लघु प्रकल्पामध्ये 26 .28% जलसाठा आहे.