मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. शहरात १८ जानेवारीला एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कमीदाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी साठवून ठेवावे लागणार आहे.


दुरुस्ती कामामुळे परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील माहीम भूमिगत बोगद्याजवळ १२०० मिमी व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचे काम १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मरोळ-मरोशीपासून माहीम-रुपारेल ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा १२ तासांकरिता बंद करावा लागणार आहे. त्यामुळे याचा परिणाम हा पाणी पुरवठ्यावर होणार आहे.


पाणीपुरवठा होणार नाही


गुरुवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत दरम्यानच्या शहर भागातील बहुतांशी ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेय.


या भागांत पाणी नाही


संपूर्ण मुंबईत ए, सी, डी, ई, जी उत्तर, जी दक्षिण, एच पश्चिम भागांत या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे नरीमन पॉइंट, कुलाब्यापासून ते थेट वांद्रे रेक्लमेशनपर्यंतच्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.