सर्जिकल स्ट्राईकवर संजय निरुपम यांचा सवाल, व्हिडिओनंतरही म्हटले फेक
सर्जिकल स्ट्राईकवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. फक्त सर्जिकल स्ट्राईकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच फेक आहे, असा हल्लाबोल संजय निरूपम यांनी केला आहे. निरुपम यांनी मोदींवर तीन शब्दात निशाणा साधला. २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करताना तो फेक आहे. दरम्यान, काँग्रेसने त्यांचे वक्तव्य गांर्भीयाने घेतलेले नाही. मात्र, भाजपने निरुपम यांच्या वक्तव्यावरुन जोरदार हरकत घेतली आहे.
मुंबई : सर्जिकल स्ट्राईकवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. फक्त सर्जिकल स्ट्राईकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच फेक आहे, असा हल्लाबोल संजय निरूपम यांनी केला आहे. निरुपम यांनी मोदींवर तीन शब्दात निशाणा साधला. २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करताना तो फेक आहे. दरम्यान, काँग्रेसने त्यांचे वक्तव्य गांर्भीयाने घेतलेले नाही. मात्र, भाजपने निरुपम यांच्या वक्तव्यावरुन जोरदार हरकत घेतली आहे.
मोदी हेदेखील फसवणूक करणारेच आहेत, असाही आरोप त्यांनी केला. मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी आले तेव्हा त्यांनी १९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र २०१८बाबत ते काहीही बोलले नाहीत. त्यांनी देशाची फसवणूक केली आहे, असे निरुपम यांनी म्हटलेय.
पंतप्रधान मोदी हे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीबाबत कधीही काहीही बोललेले नाहीत. त्यांच्या राज्यात सैनिक मारले जात आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाहीत त्याबाबत पंतप्रधान मूग गिळून आहेत, असाही आरोप संजय निरुपम यांनी केला.